कोईमतूरमध्ये मॉक ड्रिलदरम्यान ढकलल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

चेन्नईआपत्तीला कसे सामोरे जायचे, याबाबतचे प्रात्यक्षिक सुरु असताना, एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मॉक ड्रिलदरम्यान बीबीएच्या या विद्यार्थिनीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलण्यात आले. मात्र पहिल्या मजल्याच्या गॅलरीवर डोके आपटून तिचा मृत्यू झाला. लोकेश्वरी असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. तामिळनाडूतील कोईमतूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

या मॉक ड्रिलसाठी स्वयंसेवक म्हणून अन्य विद्यार्थी खाली संरक्षक नेट लावून उभे होते. मात्र पीडित विद्यार्थिनीला ढकलल्यानंतर पहिल्या मजल्याच्या कठड्याला तिचे डोके आपटून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा विचलित करणारा व्हिडीओ सध्या शेअर होत आहे.

लोकेश्वरी कोईमतूरमधील कलईमगल आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. काल या कालेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात होते. त्यावेळी अनेकांनी वरुन उड्या मारुन यशस्वी बचाव केल्याची प्रात्यक्षिके दाखवली. मात्र लोकेश्वरीला वरुन खाली उडी मारण्याचे धाडस होत नव्हते. ती प्रचंड घाबरत होती. त्यावेळी प्रशिक्षक अरुमुगन तिला उडी मारण्यासाठी सांगत होते, तिला प्रेरणा देत होते. मात्र तरीही लोकेश्वरी घाबरत असल्याचे पाहून, प्रशिक्षकाने तिला मागून धक्का दिला.

लोकेश्वरी खाली कोसळताना तिचे डोके पहिल्या मजल्याच्या गॅलरीला धडकले. त्यामुळे तिला जबर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हे प्रात्यक्षिक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलं होतं, असा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे.

मात्र तामिळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे आयुक्त राजेंद्र रत्नू यांनी या प्रात्यक्षिकाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणतीही आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरं ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच आयोजित केली जातात, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशिक्षक अरुमुगन यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, लोकेश्वरीच्या मृत्यूप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)