कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार लावणाऱ्या 16 जणांना अटक

पिरंगुट- पिरंगुट-उरावडे रस्त्यावरील मुकाईवाडी येथील हॉटेल निसर्गवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून बेकायदेशीर दारू विक्री व कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या 16 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 5 हजार 690 रुपये रोख तर 4 हजार 530 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य तसेच 7 हजार 230 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
राजेश धनराज रुई, अरुण देविदास सरोदे, विश्वनाथ डेजू शेट्टी, हरीश नारायण पुजारी, नारायण आबाराव पवार, सुरंदर मंदार हेगडे, संदीप रमेश शेट्टी, वासू जोजेकर खरखेरा, रविंदर सूर्यभान सिंग, मकरंद प्रदीप घाडगे, सायन अरका छत्री, कुबेर कृष्णा अधिकारी, बाळकृष्ण मलिंगा इलतवारी, दयानंद सुंदर पुजारी हॉटेल चालक प्रसन्ना मांजय्या शेट्टी (रा. गंधर्व नगरी, मोशी), मॅनेजर गंगाधर चंदू कोरायन यांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळालेल्या माहितीनुसार मुकाईवाडी रस्त्यावरील हॉटेल निसर्गमध्ये बेकायदेशीर दारूविक्री होत आहे. तसेच फायटर कोंबड्याच्या झुंज लावून त्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, रमेश खुणे, सतीश अस्वर, रमेश राजगुरू, सुनील बांदल, रमेश थोरात, विजय पाटील, मोरेश्वर इनामदार, सुनील जावळे, शरद कांबळे, शंकर जॅम, दत्तात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, गुरू जगताप, मुकुंद आयचित, विजय कांचन, रवी शिनगारे, रौफ इनामदार, महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल साळुंके, शरद माने, गणेश महाडिक, धिरज जाधव, एस. लोंढे, ज्योती कांबळे, स्वाती सामंत, पी. नवले, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)