कोंबडवाडी घाट रस्त्याची दयनीय अवस्था

पेठ- कुरवंडी मार्गे कोंबडवाडी (ता. आंबेगाव) भागातील ठाकरवाडी घाटातून जाणाऱ्या लांडेवाडी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खडी टाकून ठेवली आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम सुरू करून त्यावर डांबर अथवा मऊ मुरूम टाकावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सातगाव पठार भागात कुरवंडी ते कोंबडवाडी ते ठाकरवाडी हे चार कि.मी.च्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. घाट मार्गामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत. तसेच या घाट मार्गावर अनेक चढ असल्याने गाड्या चढण्यास खूप त्रास होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)