कोंढापुरी येथील पाच विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती

रांजणगाव- कोंढापुरी (ता. शिरूर) येथील प्राथमिक शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथमच दैदीप्यमान यश संपादन केले आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत पाच विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. रविकुमार रामू हरिजन, साक्षी बाबासाहेब गुडेकर, कुणाल संतोष काळे, रांजल संतोष राऊत, प्राची रवींद्र शेलार आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र प्रमुख श्रीहरी पावसे, सरपंच नंदा ढसाळ, उपसरपंच आशिष गायकवाड, दिनेश गायकवाड, बापू दरवडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतिश गायकवाड, सविता गायकवाड, सागर गायकवाड, राम गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड, सौरभ रोहिदास नवसुपे, संगिता शरद भोसले व मुख्याध्यापक मुगुटराव मोरे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)