कोंढापुरी तलावाला टक्केवारीनुसार पाणी सोडावे

रांजणगाव गणपती- चासकमान कालव्याला आवर्तन सोडल्यावर कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावात पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे येथील परिसरातील शेतकरी बांधवांची पिके जळून चालली आहेत, तसेच रांजणगाव ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना ही या तळ्यावर अवलंबून असल्यामुळे या तलावात टक्केवारीनुसार पाणी सोडावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंकर आणि इतर ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी चासकमानचे विभागीय अधिकारी ए. एस. चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, नामदेव पाचुंदकर, पिंपरी दुमालाचे माजी सरपंच दिलीप खळदकर, गणेगाव खालसा तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मुक्ताराम बांगर, ईश्वर बांगर, दिनेश गायकवाड, पोपटराव गायकवाड यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)