कोंढापुरीत बसमधून पावणेनऊ लाखांचे दागिने लंपास

शिक्रापूर-कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुण्याहून शिरपूर-धुळे येथे जाणाऱ्या एका बसमध्ये बसलेल्या एका दाम्पत्याचे 8 लाख 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले असल्याची घटना घडली.
याबाबत वसंत दशरथ मोरे (रा. पिंपळे सौदागर, दीपमाला सोसायटी, कोकणे चौक पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वसंत मोरे व त्यांची पत्नी हे पुणे येथून धुळे येथे त्यांच्या नातेवाइकांच्या लग्नासाठी चालले असताना त्यांनी सर्व दागिने सोबत घेतले होते. पुणे येथून ते बसमध्ये (एमएच 18 डीए 0971) बसले रात्री साडेअकराच्या सुमारास बस पुणे-नगर रस्त्यावरील कोंढापुरी हद्दीतील हॉटेल सूरजसमोर थांबली असता प्रवासी खाली उतरले. त्यावेळी मोरेदेखील खाली उतरले. काही वेळातच मोरे हे पुन्हा बसमध्ये गेले असताना त्यांना त्यांची बॅग कापली असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी बॅगेमध्ये पाहिले असता त्यांना बॅगेतील सोन्याचे मणीमंगळसूत्र, दोन पाटल्या, सोन्याच्या चार बांगड्या, सोन्याचा हार, सोन्याचे ब्रेसलेट असे दागिने चोरी गेल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेत वसंत मोरे यांनी फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व विजय गाले हे करीत आहेत.

  • बसमधील सीसीटीव्ही बंद
    कोंढापुरी येथे ज्या बसमधून आठ लाख बहात्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाले त्या बसमध्ये सीसीटीव्ही आहेत. चोरीची घटना घडली त्यावेळी सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले असून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसल्यामुळे गुन्ह्याचा तपास लावण्यात अडचणी येत असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)