कोंढवामध्ये हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायाचा पर्दाफाश

कोंढवामध्ये हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायाचा पर्दाफाश
चार मुलींची सुटका : स्पा मालक, व्यवस्थापकाला अटक
……………………….
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.23 – सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढवा येथे मसाज पार्लरवर छापा टाकून हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायाचा पर्दाफाश केला. येथून थायलंड दोन, मिझोराम एक व महाराष्ट्रातील एका मुलीची सुटका केली आहे. स्पा मालक व व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्पा मालक पूनम कुंदन जहॉंगीर, रिसेप्शनिस्ट झेबा अंजुम शेख (43) स्पा व्यवस्थापक मंजुर शमशुद्दीन आलम (30) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील नितीन तेलंगे यांना कोंढवा येथील सनश्री वुडस इमारतीत श्रिध्दा वेलनेस मसाज सेंटरमध्ये हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. यानंतर छापा टाकून कारवाई केली. पीडित मुलींना स्पामध्ये मसाज करण्यासाठी ठेऊन जादा पैशाचे आमिष दाखवून वेश्‍याव्यवसायात ओढल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्‍त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, महिला पोलीस शिपाई शीतल भालेकर, नितीन तेलंगे व कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)