कोंढणपूर-कल्याण रस्त्यावर अपघात, युवकाचा मृत्यू

रहाटवडे – कोंढणपूर-कल्याण रस्त्यावर आर्वी फाट्याजवळ दुचाकीस्वार एका कारला ओव्हर टेक करीत असताना समोरून आलेल्या टेम्पोच्या आरशाला धडकून झालेल्या अपघात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत टॅम्पोचाकल/मालक श्रीकांत प्रल्हाद आंबिलगे (वय 31, रा. धनकवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
ऋषीकेश विलास काळोखे (वय 21, रा. धायरी, पुणे) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे, तर आशीष चंद्रकांत गायकवाड (वय 18, रा. सिंहगड रोड, पुणे) हा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबतची माहिती अशी की, कोंढणपूर-कल्याण रस्त्यावरील आर्वी फाटा बाह्यवळणावर काळोखे व गायकवाड हे दोघे युवक दुचाकीवरून (तात्पुरता नंबर एमएच 12 टीसी 462) भरधाव वेगाने कल्याणबाजूकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या पुढील कारला ते ओव्हरटेक करीत असताना काळोखेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो थेट टेम्पो (एमएच 12 केपी 5717)च्या आरशाला धडक दिल्याने त्यांची दुचाकी स्लीप झाली, यात काळोखेच्या डोक्‍याला जबर मार बसल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. तर गायकवाडवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात झालेल्या दुचाकीचे अद्याप आरटीओ पासिंगही झालेले नव्हते.दरम्यान, टेम्पो मालक श्रीकांत प्रल्हाद आंबिवले यांनी मयत ऋषीकेश काळोखे याच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)