कोंडीला पर्याय मिळेल ?

प्रभात  स्पेशल

वाहतूक कोंडीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सातारा

सातारा – पोवईनाक्‍यावरील ग्रेडसेप्रेटरच्या कामामुळे तसेच शहरातील काही रस्त्यांवरही किरकोळ दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. पोवई नाक्‍यावरुन पोलिस मुख्यालयाकडे जाणाऱ्या रविवार पेठेतील रस्त्यावर तर वाहतूक कोंडी वाहनधारकांसह नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच बसस्थानकाकडून जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खासगी वाहतूक करणाऱ्या वडाप व विक्रेते हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण असल्याचे बोलले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही महिन्यांपासून पोवईनाक्‍यावर सुरू असलेल्या ग्रेडसेप्रेटरच्या कामामुळे, शहरातील सर्वच वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोवईनाक्‍यावर सुरु झालेल्या कामामुळे वाहतूक अन्य रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे काही अंशी का होईना वाहतुकीचा ताण कमी झाला होता. परंतु, शहरातील वाढती वाहतूक, किरकोळ व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे तसेच ज्या रस्त्याने वाहतूक वळवली ते रस्ते अरुंद असल्याने तसेच रस्त्यावरच पेठकऱ्यांची उभी असलेली वाहने यामुळे वाहतूक पोलिसांसह वाहनधारकांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.

शहरातील अन्य भागातही रस्त्याची कामे सुरु आहेत. त्या दरम्यान वाहतुकीला पर्यायी मार्गदेखील न दिल्याने शहरातील रस्त्यांवर तासन्‌तास वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सुरु आहेत. शाहूपुरी येथेही पुलाच्या कामाला सुरुवात केली असून हे कामदेखील दीर्घकाळ चालणार असल्याने शाहूपुरीसह परिसरातील नागरिकांच्या अडचणीत भरच पडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)