कोंडवेतील अत्याचारप्रकरणी सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

सातारा – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला सक्तमजुरीची शिक्षा सुनाण्यात आली. सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाला दिला आहे. अक्षय अविनाश चव्हाण (रा. विघ्नहर्ता कॉलनी, कोंडवे ता. सातारा) असे शिक्षा झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या युवतीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला होता. दरम्यानच्या काळात युवती गरोदर राहिली होती. तिने एका अपत्याला जन्म दिला होता. त्यानंतरही संशयीताने लग्नाला नकार दिल्याने युवतीने 2010 मध्ये सातारा तालुका पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. दाखल तक्रारीचा तपास तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक स्मिता नवघरे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायालयात झालेल्या साक्षी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष व कागदपत्रे यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)