कोंची येथे मोठेबाबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील कोंची येथील हजारो भक्तांचे श्रध्दास्थान व ऐक्याचे प्रतिक असलेल्या मोठेबाबा यात्रेला आज पासून प्रारंभ झाला आहे. दोन दिवस असलेल्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला हजारो वर्षांच्या परंपरेचा वारसा आहे.

आज सकाळी मांडव डहाळे व त्यानंतर रात्रौ लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार  दुपारी महाराष्ट्रातील नामवंत पहिलवानांच्या सहभागात कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार असून या कार्यक्रमात परिसरातील भाविकांनी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष माणिकराव जोंधळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कोंची गावाने पाच वर्षांपासून गावात दारूबंदी करून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे तसेच दरवर्षी शांततेत यात्रा पार पाडण्याची परंपराही कायम राखली असल्याचे सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण जयवंत गिते यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
35 :thumbsup: Thumbs up
15 :heart: Love
8 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
7 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)