कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात आणखी एकाला अटक

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी : यापूर्वी सहा अटकेत

पुणे – कॉसमॉस बॅंकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून 94 कोटी 42 लाख रुपये लांबविल्याप्रकरणात मुंबई येथून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. अँथोनी ऑगस्टीन (वय 40, रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच.आर.जाधव यांनी दिला आहे.

या प्रकरणात यापूर्वी नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय 34, रा. विरार, मुळ.ओरिसा), मोहंमद सईद ईक्‍बाल हूसेन जाफरी उर्फ अली (30, रा.भिवंडी), हिम मेहफूज शेख (वय27, रा. भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय 30, रा. औरंगाबाद), शेख मोहंमद अब्दुल जब्बार (वय 28, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय 22, रा. नांदेड) या सहा जणांना अटक केली आहे.

ही घटना 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान घडली होती. अँथोनी याला अटक करून सायब्रर क्राईम सेलच्या पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी बनावट एटीएम कोठे बनविले, गुन्ह्याचे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, साथीदारांच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)