कॉसमॉस बॅंकेवरील हल्ला प्रकरणी एकाला अटक

पुणे – कॉसमॉस बॅंकेवर हल्ला प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून पुण्यातून एकाला सायंकाळी अटक करण्यात आली. मोहनलाल ताराजी राठोड (सध्या रा. श्री गणेश अपार्टमेंट, विश्रांतवाडी, मूळ रा. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर राठोडने मुंबईतील चार ते पाच एटीएम केंद्रातून साडेतीन लाख रुपये काढले होते. त्याच्याबरोबर आणखी तिघेजण होते. गेल्या वर्षभरापासून तो पुण्यातील एका औषध विक्रीच्या दुकानात काम करत आहे. त्याच्याकडून मोबाइल संच आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहे. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे तपास करत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)