कॉसमॉस प्रकरण : सर्वाधिक रक्कम काढलेल्या दहा देशांची यादी तयार

ब्रिजेस सिंग : ग्राहकांच्या खात्यात जमा रक्कमेच्या वसुलीसाठी पथके रवाना
पुणे – कॉसमॉस बॅंकेतील बहुतांश रक्‍कम परदेशातून काढण्यात आली आहे. ज्या 28 देशांत रक्‍कम काढण्यात आली. त्यातील सर्वाधिक रक्‍कम काढण्यात आलेल्या दहा देशांची यादी तयार केली आहे. त्या देशांशी कायदेशीर पध्दतीने बोलणी सुरू करण्यात आली आहे.

तसेच, सर्व्हर हॅक केल्यानंतर झालेल्या एकूण व्यवहारातील खरे, खोटे व्यवहार पडताळण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती राज्याचे सायबर सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी दिली. तसेच, देशात काही ग्राहकांच्या खात्यात जमा झालेली रक्‍कम वसूल करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या तपासासाठी पथके तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड रोडवरील मुख्य कार्यालयास ब्रिजेश सिंग यांनी बुधवारी भेट दिली. देश आणि विदेशातील सायबर तज्ज्ञांसोबत चर्चा करीत गुन्ह्याचा तपासासंदर्भात माहिती घेतली. यावेळी आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग उपस्थित होत्या.

ब्रिजेश सिंग म्हणाले, परदेशातील व्हिसा कार्डवरून तब्बल 76 कोटींची रक्‍कम काढण्यात आली आहे. त्या तुलनेत देशांतर्गत काढलेली रक्‍कम कमी आहे. हॅकर्संनी बॅंकेच्या सर्व्हरवर व्हायरसव्दारे हल्ला करून क्‍लोन कार्डव्दारे एटीएम सेंटरमधून विशिष्ट कालावधीत रक्‍कम काढून घेतली आहे. त्यामुळे त्या विशिष्ट कालावधीत एकूण व्यवहारात क्‍लोन कार्डव्दारे आरोपींनी केलेले व्यवहार आणि ग्राहकांनी केलेले व्यवहार या माहितीची पडताळणी केली जात आहे. देशांतर्गत एटीएम सेंटरमध्ये झालेल्या काही व्यवहाराचे सीसीटीव्ही चित्रफित पथकाच्या हाती लागल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)