कॉसमॉस प्रकरणात आणखी दोघांना अटक : अटक केलेल्यांची संख्या सहा

पुणे – कॉसमॉस बॅंकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून 94 कोटी 42 लाख रुपये लांबविल्याप्रकरणात विरार आणि भिवंडी येथून आणखी दोघांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सहा झाली आहे. दरम्यान, अटक दोघांना 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच.आर. जाधव यांनी दिला आहे.
नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (वय 34, रा. विरार, मुळ.ओरिसा), मोहंमद सईद ईक्‍बाल हूसेन जाफरी उर्फ अली (30, रा.भिवंडी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला हिम मेहफूज शेख (वय27, रा. भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय 30, रा. औरंगाबाद) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीत शेख मोहंमद अब्दुल जब्बार (वय 28, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय 22, रा. नांदेड) यांना गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या पोलीस चौकशीनंतर महाराणा आणि जाफरी यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी या दोघांनी किती रक्कम काढली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्‍यता आहे. फरार साथीदार आणि मास्टर माइंडच्या शोधासाठी, त्यानी बनावट कार्ड कोठे बनविली, त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बॅंकेचा डाटा कसा मिळविला, याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)