“कॉसमॉस’ तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक

पोलीस अधिकाऱ्यांसह सायबर तज्ज्ञांचा असणार समावेश

पुणे- कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयात असलेल्या सर्व्हरवर हॅकरने हल्ला चढवून रूपे डेबिट कार्ड आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून 94 कोटी 42 लाख रुपये लांबविल्याप्रकरणात पुणे पोलिसांकडून तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात पोलीस अधिकाऱ्यांसह सायबर तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. दरम्यान, कोल्हापूरातून काही पैसे काढण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचे पथक कोल्हापुरकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हरवर हल्ला करून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, राधिका फडके, सहा पोलीस कर्मचारी तसेच सायबर गुन्हे विषयक तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी बॅंक अधिकाऱ्यांकडून काही तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सायबर हल्ला करणाऱ्या चोरट्याने बॅंकेच्या खात्यातील रक्कम हॉंगकॉंग येथील हॅनसेंग बॅंकेच्या खात्यात जमा केली आहे. तसेच, परदेश आणि देशातील काही खात्यांतून काही रक्कम काढण्यात आली आहे.

 

राज्य पोलीस दलाचे सायबर सिक्‍युरिटी विभाग प्रमुख ब्रिजेश सिंग बुधवारी (दि.15 ऑगस्ट) शहरात आले होते. पुणे शहर सायबर सेलचे तपासाधिकारी, बॅंकचे सायबर एक्‍सपर्ट आणि हैदराबाद, मुंबई येथील सायबर फॉरेन्सिक एक्‍सपर्ट यांची बैठक झाली. मुंबई, कोल्हापूरसह देशात जेथे पैसे काढले आहेत, त्यांची माहिती गोळा केली जात आहे. पोलिसांनी तपासासाठी आवश्‍यक असलेली माहिती बॅंकेला मागितली आहे.
– के. वेंकटेशम पोलीस आयुक्त, पुणे शहर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)