कॉसमॉसच्या सायबर हल्ल्यानंतर सहकारी बॅंक सर्तक

पुणे – कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्यानंतर आता सर्वच सहकारी बॅंका जागरुक झाल्या असून सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील घडामोडीची माहिती आदान – प्रदान करण्यासाठी मध्यवर्ती माहिती केंद्र (सेंटल नॉलेज हब) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सहकारी बॅंकांनी सद्य:स्थितीत कॉसमॉस सहकारी बॅकेतून आपल्या ठेवी काढू नयेत, असा ठराव पुणे जिल्हा सहकारी बॅंक्‍स असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.

कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर असोसिएशनच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, संगणक क्षेत्रातील निरंजन फडके,मोहन कामत, जिल्हा बॅक्‍स असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत टकले, कार्यकारी संचालिका संगीता कांकरिया यांच्यासह सातारा, सांगली,कोल्हापूर, नगर, सोलापूरसह आदी जिल्ह्यातून सहकारी बॅंकाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि आयटी प्रमुख उपस्थित होते.

कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्यानंतर घाबरून जावून सहकारी बॅंकांनी कॉसमॉसमधून त्यांच्या ठेवी व रक्‍कम काढून घेऊ नयेत, असा ठराव यावेळी अनास्कर यंनी मांडला. हा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. त्याचबरोबर या सायबर हल्ल्यातील तपासाच्या निर्ष्कषानुसार सहकारी बॅंकांनी खबरदारीबाबत स्वतंत्र अहवाल तयार करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

अशा कठीण काळात सहकारी तत्त्वानुसार सगळ्यांनी कॉसमॉस बॅंकेच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे, अशा कठीणप्रसंगी प्रतिस्पर्धी न होता परस्परांशी सहकार्याची भूमिका ठेवल्यास सहकार बॅंकिंग क्षेत्र सक्षम असेल, असे बैठकीत अनास्कर यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)