कॉसमॉसच्या दीर्घ मुदत ठेव योजनेस भरघोस प्रतिसाद

पुणे- नुकतीच कॉसमॉस को ऑप. बॅंकेने ग्राहकांसाठी दि. 16 मार्चपासून दीर्घ मुदत ठेव योजना जाहीर केली होती. सदर योजनेस 8.50 टक्‍के व्याजदर देण्यात आला होता व योजनेचा कालावधी 66 महिने होता. दीर्घ मुदत ठेव योजनेसाठी रु. 145 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट कामकाजाच्या केवळ पाच दिवसांत पूर्ण झाले. रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दीर्घ मुदत ठेव योजनेतील ठेवी संकलित करण्यात आल्या.

विक्रमी वेळेत या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, ग्राहकांनी पुन्हा एकदा बॅंकेवरील आपला विश्‍वास दृढ असल्याचे सिध्द्‌ केले आहे असे मत कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी व्यक्‍त केले, तसेच यानिमित्ताने सर्व ठेवीदारांचे त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्द्‌ल आणि बॅंकेवरील विश्‍वासाबद्दल मनापासून आभार मानल्याचेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)