कॉल ड्रॉप बद्दल दूरसंचार कंपन्यांना 58 लाखांचा दंड 

नवी दिल्ली – मोबाईल फोन सेवेमध्ये सेवा अचानक खंडीत होण्याचे किंवा कॉल मध्येच थांबण्याचे जे प्रकार होतात त्याबद्दल दूरसंचार कंपन्यांवर काटेकोर पणे कारवाई केली जात असून अशा प्रकारांबद्दल बीएसएनएलसह अन्य दूरसंचार कंपन्यांना आत्ता पर्यंत 58 लाख रूपयांचा दंड झाला आहे अशी माहिती दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी आज राज्यसभेत दिली. त्यांनी सांगितले की सरकारी मालकीच्या बीएसएनएल कंपनीला यासाठी आत्तापर्यंत चार लाख रूपयांचा दंड झाला आहे. तर गेल्या तीन महिन्यात आयडीया कंपनीला बारा लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दूरसंचार आयोगाकडून या सेवेवर लक्ष ठेवले जात आहे.

मोबाईल सेवेतील कॉल ड्रॉपचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सरकारने इंटिग्रल व्हाईस रिस्पॉन्स सिस्टीम सेवा सुरू केली असून त्याद्वारे थेट ग्राहकांकडून फीडबॅक घेतला जात आहे. या सेवेत आत्तापर्यंत अडीच कोटी ग्राहकांना जोडण्यात आले आहे. मोबाईल टॉवर मधून रेडिएशन होते अशा नागरीकांच्या तक्रारींमुळे दूरसंचार कंपन्यांना टॉवरची उभारणी करण्यात अडचणी येत असल्याचेही मंत्र्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)