कॉल ड्रॉप कमी करण्यासाठी कंपन्या 74 हजार कोटी खर्च करणार- अरुणा सुंदरराजन

नवी दिल्ली-कॉल ड्रॉपचा प्रश्‍न अजूनही कमी झालेला नाही. कंपन्या त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणार आहेत. त्यासाठी या कंपन्या 74 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले आहे. ही माहिती दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यानी दिली.

त्या म्हणाल्या की, आज याबाबत बैठक घेण्यात आली. काही कंपन्यांनी सांगितले की, त्या टॉवर उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यासाठी जागा मिळत नाही. एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगितले की या कंपनीने अगोदरच 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

-Ads-

त्याचबरोबर आणखी 24 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे. रिलायन्स 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1 लाख टॉवर उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करीत असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, बऱ्याच वेळा फोनचा दर्जा चांगला नसल्यामुळे आवाजाच्या दर्जावर परिणाम होत आहे. त्यामुळे फोनच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

त्याचबरोबर चीनसारख्या देशात एका मोबाइल टॉवरच्या माध्यमातून 200 ते 300 लोक मोबाइलचा वापर करतात तर भारतात ही संख्या 400 पर्यंत वाढते. त्यामुळे एवढे कॉल हाताळणारी यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यातून मार्ग निघण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक महिन्याला इंटरनेटचा वापर 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. तर व्हाईसचा वापरही 50 टक्‍क्‍यांनी वाढत असल्याबद्दल काही कंपन्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. या बदललेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन मोबाइल सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे कंपन्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)