‘कॉलेज जर्नी’ २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात…

मैत्री, प्रेम आणि तरुणाईचा सळसळता उत्साह कॉलेज मध्येच पाहायला मिळतो. मित्रांसोबत घातलेला राडा, पहिलं प्रेम, नव्याने मिळालेले स्वातंत्र्य, लेक्चर्स बंक करण्यातली मजा, नवनवे अनुभव घेण्याची उत्सुकता या सगळ्या गोष्टी घडण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कॉलेज कट्टा. कॉलेजच्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने मनाशी जपलेला असतो. कॉलेजची हीच धमाल ‘अशी ही आमची कॉलेज जर्नी’ या आगामी चित्रपटातून अनुभवत नॅास्टेलजिक होण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. बालाजी फिल्म क्रिएशनची प्रस्तुती असलेला ‘कॉलेज जर्नी’ सिनेमा २ फेब्रुवारीला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाल (आप्पा) कानकाटे या चित्रपटाचे निर्माते असून अभिजीत साठे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

कॉलेज लाइफमध्ये धम्माल मस्ती करणारी दोस्त मंडळी, एकमेकांशी असलेले नाते आयुष्यभर जपतात. त्यांच्या याच मैत्रीच्या नात्याचा वेध घेत शंतनू आणि अश्विनी यांच्या प्रेमाचा हृदयस्पर्शी प्रवास हा चित्रपट उलगडतो. कॉलेजमधील धमाल अनुभवत असताना शंतनूला काही गोष्टींचा सामना करावा लागतो. या गोष्टींचा सामना शंतनू करू शकतो का? व यातून त्याची मैत्री व प्रेम त्याला मिळतं का? याची कथा म्हणजे कॉलेज जर्नी’ हा सिनेमा.

-Ads-

वेगवेगळ्या जॉंनरची चार गाणी या सिनेमात आहेत. गीतकार अभिजीत साठे, शुभम जाधव, गरुठा गुळीक यांच्या लेखणीने सजलेल्या या गाण्यांना साई-पियूष यांनी संगीतसाज चढवला आहे. अवधूत गुप्ते, रोहित राऊत, मालविका दीक्षित यांनी ही गाणी गायली आहेत. पार्श्वसंगीत अनुराग भारद्वाज यांचे आहे. अर्चना जावळेकर व अनिल सुतार यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी तर सहनृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी ललिता साठे, कोमल निळकंठ, प्रियंका जावळेकर, मयुरी जावळेकर यांनी सांभाळली आहे.

सुप्रिया पाठारे, हर्षद वाघमारे, मोहिनी अवसरे, शरदभाऊ जोरी, प्रदीप बनसोडे, सतीश बनसोडे, शुभम बनसोडे, सोमनाथ बोरगावे, मयुरी भालेराव, सुप्रिया बरकडे, आदेश चांदोडे, राजलक्ष्मी बसवंती या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. कथा-पटकथा-संवाद अभिजीत साठे यांनी लिहिले आहेत. सहनिर्माते केडी चौधरी (ग्रुप पुणे) तर कार्यकारी निर्माते विनोद बरई आहेत. मुख्य सहदिग्दर्शन प्रवीण देशमुख यांनी केले असून सहदिग्दर्शन अश्विनी अशोक दौंडकर, आकाश बनसोड, सौदागर बदर, सुधीर धुरी, आकाश कांबळे यांचे आहे. वेशभूषा धनश्री कामतेकर, महेश ढावरे यांनी केली आहे. कलादिग्दर्शक मधु कांबळे आहेत. संकलन विनोद चौरसिया तर छायांकन रवी लोकरे यांचे आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)