कॉलेजमध्ये प्रमुख विषयाची निवड करताना…

गोंधळून जाऊ नका
अशा प्रकारचे टप्पे पार केल्यानंतरही आपण विषय निवडीवरून संभ्रमात असाल तर गोंधळून जाण्याचे कारण नाही. प्रत्येकालाच अशा स्थितीतून जावे लागते आणि प्रत्येकाच्या दृष्टिकोनात स्पष्टता असतेच असे नाही. आपण नियमितपणे कॉलेज करावे आणि कालांतराने आपल्याला एखाद्या विषयाबाबतची आवड निर्माण होऊ लागते. कॉलेज, विद्यापीठ आपल्याला सर्वप्रकारचे स्त्रोत उपलब्ध करून देत असते. या स्त्रोतांच्या आधारे आपण करियरचा आणि विषयाला न्याय देऊ शकतो. मनातील गोंधळ जेवढा लवकर संपेल, त्याप्रमाणात विषयाबाबत स्पष्टता लवकर येईल.

अपर्णा देवकर

कनिष्ठ महाविद्यालयातून वरिष्ठ महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करणारे विद्यार्थी प्रमुख विषयांची निवड करण्यावरून संभ्रमात असतात. महाविद्यालयीन जीवनात निवडण्यात येणाऱ्याअभ्यासक्रमातून आपल्या करिअरला दिशा मिळत असते. विषयाची निवड करताना आपण शाळेतील स्रोतांची देखील मदत घेऊ शकतो. करिअर सेंटर किंवा व्यक्तिमत्त्व विकास चाचणीच्या माध्यमातूनही विषय निवडीला हातभार लागू शकतो. विषयासंबंधीच्या अपेक्षा आपण कमीत कमी ठेवल्यास निवडीला फारसा त्रास होत नाही. इच्छुक क्षेत्रात असलेल्या व्यक्तींशीसल्लामसलत करून आपण विषयाची शॉर्टलिस्ट करू शकतो. काही विद्यार्थी मित्रांच्या सांगण्यावरून किंवा वातावरणानुसार विषयाची निवड करतात. इथे फसगत होण्याची शक्‍यता अधिक असते. प्रत्येकाची अध्ययन क्षमता आणि आकलन शक्ती सारखी नसते. दुसऱ्याने निवडलेला विषय आपणही निवडावा असे बंधन नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या अभ्यासक्रमात प्रमुख विषय निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात यासंदर्भात काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.

आपली आवड काही विद्यार्थी अगदी सहजपणे प्रमुख विषयाची निवड करतात. कारण अशा विषयात विद्यार्थ्यांना रस, आवड असते. तुम्ही जर आवडीचा विषय निवडला तर कॉलेज, ग्रंथालय, सेमिनार, विशेष वर्गाच्या मदतीने आपण संबंधित विषयात अधिक प्राविण्य मिळवू शकतो. इच्छा नसताना जर एखाद्या विषयाची निवड केली तर आपल्याला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळत नाहीत आणि आपण अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतो. अशा स्थितीत आपल्याला आवडीच्या क्षेत्रातीलच अभ्यासक्रम, प्रमुख विषय निवडीबाबत सजग असावे.

रोजगाराची संधी आणि वाव एखादा विषय निवडताना भविष्यात संबंधित विषयाला वाव आणि संधी कशी आहे, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कालबाह्य अभ्यासक्रमाची निवड करून आपण स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. एखादा विषय जरी अवघड असेल आणि त्यात चांगली संधी असेल तर आपण तो विषय मेहनतीने पूर्ण करू शकतो. केवळ आपल्या आवडीखातर कोणत्याही विषयाची निवड करण्याची चूक करू नये. संबंधित क्षेत्रातील, विषयातील तज्ज्ञांची, प्राध्यापकांशी, सहकाऱ्यांशी, मित्र-मैत्रिणीशी, पालकांशी चर्चा करून प्रमुख विषयाची निवड करावी. जेणेकरून भविष्यात करिअर निश्‍चित करताना फारशा अडचणी येणार नाहीत.

क्षमता ओळखा आपण ज्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याची क्षमता राखून आहोत, अशा विषयाची निवड करण्यास प्राधान्य द्यावे. ज्या क्षेत्राची आपल्याला रुची, आवड आहे तसेच कौशल्य अवगत आहे अशा विषयाची निवड आपण करावी. स्वत:ची प्रामाणिक राहा. जर तुम्हाला एखाद्या विषयाची खात्री नसेल तर असा विषय निवडण्याचे टाळावे. आजघडीला असंख्य पर्याय आपल्यासमोर आहेत. त्याचा विचार करा. कॉलेजच्या नवीन वर्षाची सुरुवात करताना वैविध्यपूर्ण विषयाचा विचार करा. अशा तऱ्हेने आपण एखाद्या विषयात लवकर कौशल्य आत्मसात करू शकतो.

कृती आणि मूल्यांकन करा वरिष्ठ महाविद्यालयात प्रमुख विषय निश्‍चित करताना विषय तज्ज्ञांशी सल्ला घ्या. एकदा निर्णय घेतल्यानंतर कालांतराने त्याचे अवलोकन करा. प्रमुख विषयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा आढावा घ्या. निवडलेला विषय आपल्याला पूरक ठरतो की नाही याचा आढावा घ्या. कदाचित आपला निर्णय चुकीचा देखील ठरू शकतो. वेळीच बदल केल्यास पुढच्या अडचणी टाळल्या जावू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)