कॉलेजध्ये कार सुसाट; वॉचमन जखमी

वाघोली- कॉलेज कॅम्पसमध्ये भरधाव वेगाने कार चालवून वॉचमनला गंभीर जखमी केल्याची घटना जेएसपीएम कॉलेजच्या मागील बाजूच्या एमबीए गेटजवळ गुरुवारी (दि.24) घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. उत्तम कैलास खंडागळे असे गंभीर जखमी झालेल्या वॉचमनचे नाव आहे, तर कारचालक सौरभ वारघडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सौरभ वारघडे हा त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार कॉलेज कॅम्पसमध्ये भरधाव वेगाने, निष्काळजीपणे चालवत होता. कॉलेज कॅम्पसच्या मागील बाजूच्या एमबीए गेटजवळ त्याने ऑन ड्युटी वॉचमन उत्तम खंडागळे यास जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. वॉचमन खंडागळे यास उपचारार्थ पुण्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळकृष्ण वाडेकर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)