कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्‍यपद स्पर्धा; इन्फोसिस, कॅपजेमिनी संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश

पुणे – इन्फोसिस संघाने कॉग्निझंट संघाचा, तर कॅपजेमिनी संघाने टीसीएस संघाचा सरळ गेममध्ये पराभव करताना सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सिम्बायोसिस स्कूल, प्रभात रोड येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील आज झालेल्या पहिल्या उपान्त्यपूर्व लढतीत पल्लवी बॅनर्जीच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर इन्फोसिस संघाने कॉग्निझंट संघाचा 2-0 (25-18, 25-10) असा एकतर्फी पराभव करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तसेच दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात श्वेता अरोराच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर कॅपजेमिनी संघाने टीसीएस संघावर 2-0 (25-17, 25-9) अशी सहज मात करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अत्यंतच रंगतदार अशा तिसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत असेंचर संघाला टेक महिंद्रा संघाचा 2-0 (25-20, 25-23) असा पराभव करण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागली. सामनावीर संप्रिती नाथच्या अप्रतिम कामगिरीमुळे असेंचरने बाजी मारली व उपान्त्य फेरीतील स्थान निश्‍चित केले. अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत ऍमडॉक्‍स संघाने सिंटेल संघाची दुसऱ्या गेममधील झुंज मोडून काढताना 2-0 (25-14, 25-21) असा विजय मिळवीत अखेरच्या चार संघांमध्ये स्थान मिळविले.

   सविस्तर निकाल –

इन्फोसिस वि.वि. कॉग्निझंट 2-0 (25-18, 25-10) सामनावीर – पल्लवी बॅनर्जी,
कॅपजेमिनी वि.वि. टीसीएस 2-0 (25-17, 25-9) सामनावीर – श्वेता अरोरा,
असेंचर वि.वि. टेक महिंद्रा 2-0 (25-20, 25-23) सामनावीर- संप्रिती नाथ,
ऍमडॉक्‍स वि.वि. सिंटेल 2-0 (25-14, 25-21) सामनावीर शाहिनी शेरीन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)