कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरीही लवकर सापडतील – मेघा पानसरे

कोल्हापूर – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला तब्बल पाच वर्षांनी का होईना, अटक झाली आहे. आता कॉम्रेड गोविंद पानसरे याचे मारेकरीही लवकर सापडतील आणि त्यांचा खूनाचाही छडा लागेल, असा विश्वास पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी व्यक्त केला आहे. त्या कोल्हापुरात बोलत होत्या.

डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला सीबीआयने औरंगाबादमधून अटक केली. या प्रकरणी मेघा पानसरे म्हणाल्या, डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागण्यासाठी पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे अनेकदा मनात निराशाही दाटून आली. पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या खून होतो आणि मारेकरी सापडत नाहीत, हेच मनाला पटत नव्हते.

परंतु, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी कर्नाटक पोलीस हे जाळे भेदू शकले. त्यामुळे आरोपींना अटक झाली. आता आरोपींच्याकडे कसून तपास केल्यास कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरीही सापडतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)