कॉम्प्युटर अकौंटन्सीची स्मार्ट करिअरवाट

अपर्णा देवकर

प्रमुख शिक्षण संस्था
द इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल अकाऊंटंट
ग्लोबल इन्स्ट्टिूट ऑफ स्मार्ट कॉम्प्युटर अकाऊंटंट
आयसीए द इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अकाऊंटंट

सध्याच्या डिजिटल युगात फायनान्स सेक्‍टरमध्ये कॉम्प्युटर अकौंटन्सी हा एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांत अकाऊंटिंगमध्ये नोकरीचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. दुसरीकडे असे कोणतेच खाते राहिले नाही की तेथे आयटीचा संबंध येत नाही. या क्षेत्रात कोणत्याही शाखेचा पदवीधर हा केवळ एक ते दोन वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर चांगल्या कंपन्यात मोठ्या पॅकेजवर काम करू शकतो.

आजच्या काळात सर्वकाही डिजिटल होत आहे. फायनान्स आणि अकाऊंटिंग सेक्‍टरदेखील यापासून अपवाद राहिलेले नाही. कारण सरकारी आणि बिगसरकारी कार्यालयात खर्च-उत्पन्नाचा लेखाजोखा आता संगणकावरच मांडला जात आहे. आता हिशेब ठेवण्यासाठी मोठमोठे रजिस्टर ठेवण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. आजघडीला संगणकात हजारो फाईल्सची माहिती ठेवणे शक्‍य झाले आहे आणि सोपे झाले आहे. या कारणामुळेच कॉम्प्युटर अकौंटंटस्‌ना दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. हा एक असा अभ्यासक्रम आहे की, सरासरी अभ्यास करणारा युवक देखील सहजपणे पूर्ण करू शकतो आणि नोकरीची देखील हमी मिळू शकते. या अभ्यासक्रमात सॅप, एमसीए, आयएफआरएस तसेच प्राप्तीकर नियोजनाशी संबंधित विषय जोडले गेल्याने कॉम्प्युटर अकौंटन्सीला मागणी वाढत आहे.

नोकरीची संधी : या क्षेत्रात युवकांचे करिअर दमदार होऊ शकते. आजकाल मॉल्स, शो रुम्स, बीपीओ, केपीओ किंवा कारखान्यात वा अन्य लहान मोठ्या कंपन्यात बॅंक ऑफिस अकाऊंटंट, अकाऊटंट असिस्टंट, फायनान्स मॅनेजरची प्रत्येक वेळी गरज असते. जॉब मार्केटमध्ये मंदी असतानाही अकाऊंटसला मात्र मागणी कायम राहते. या क्षेत्रात कामगिरीच्या जोरावर वेतनही वाढते. बहुराराष्ट्रीय कंपन्यांकडून अकाऊटिंगमध्ये नोकरीच्या संधी सातत्याने वाढत चालल्या आहेत.

कामाचे स्वरूप : राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांत कॉम्प्युटर अकौंटन्सी खूपच जबाबदारीचे काम समजले जाते. कुशल अकाऊटंट कंपनीचे खाते सांभाळण्याशिवाय बॅंकिंग व्यवहार, ऑफिसचे काम देखील पाहतात. ऑफिसमधील सर्वप्रकारचे व्यवहार पार पाडण्यासाठी अकाऊंटचे फायनलायजेशन तसेच कॅशियरिंगसारख्या दुसऱ्या कामांची जबाबदारी देखील यांच्याच खांद्यावर असते.

वैयक्तिक कौशल्य : कॉम्प्युटर अकौंटन्सी हे मुख्य रूपाने संगणकाशी निगडित असलेले काम आहे. यासाठी आपल्याला संगणकावर काम करणे सोपे जाते. टेक्‍निकल कामाबात रुची बाळगणाऱ्या आणि हिशोब ठेवण्याचे काम करणे हे बोअरिंग वाटत नाही. म्हणूनच फायनान्स सेक्‍टर हे वैशिष्ट्‌यपूर्ण करिअर म्हणून एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.

अभ्यासक्रम आणि पात्रता : जर आपण कोणत्याही शाखेत बारावी उत्तीर्ण केलेली असेल तर आपण कॉम्प्युटर अकौंटन्सी अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. कारण यासाठी आपल्याला कॉमर्स, फायनान्सचे बॅकग्राऊंड असणे गरजेचे नाही. अर्थात आजकाल कॉमर्स आणि फायनान्सचा अभ्यास करणाऱ्यांना कॉम्प्युटर अकाऊंटिंगचे ज्ञान मिळवणे खूपच गरजेचे झाले आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षापासून ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे असे अभ्यासक्रम अद्याप खासगी शिक्षण संस्थांकडून शिकवले जातात. अभ्यासक्रमातंर्गत विद्यार्थ्याला डेटा ऍनालिसिस अँड मॅनेजमेंट, अकाऊंटस, बुक किपिंग, जीएसटी, एमएस ऑफिस, टॅली, सॅप, आयएफआरएस सारख्या अकाउंटिंगच्या काही नवीन सॉफ्टवेअरची देखील माहिती सहजपणे मिळू शकते.

वेतन : कॉम्प्युटर अकाऊंटन्सीचा अभ्यासक्रम केल्यानंतर युवकांना प्रारंभीच्या काळात पंधरा ते वीस हजारांचे वेतन मिळू शकते. अशा युवकांना एक ते दीड वर्षांच्या अनुभवानंतर वीस ते पंचवीस हजार दरमहा वेतन सहजपणे मिळू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)