कॉम्पॅक्‍टर आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी हजर

सातारा – सातारा पालिकेचा कॉम्पॅक्‍टर शेवटी आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी हजर करण्यात आला. हायड्रॉलिक यंत्रणेची दुरुस्ती ” साशा’ तर्फे करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तरीसुद्धा सातारा शहरात कचरा उचलण्याच्या मोहिमेवर दोन ट्रॅक्‍टर लावण्यात आले होते.

साताऱ्यात साशाचा जो खैदूळ चालू आहे त्याचा तोटा मात्र सातत्याने सातारा पालिकेला होत आहे. या कंपनीचे हिडन पार्टनर साताऱ्यात तळ देऊन असल्याने इतक्‍या सगळ्या गोंधळातही बिले मात्र बिन बोभाट निघतात. तिथे तेरा लाखाचा कॉम्पॅक्‍टर बिघडला तर त्याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते. मात्र आठ दिवस बिघडलेला कॉम्पॅक्‍टर शुक्रवारी हजर करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली.

-Ads-

मात्र आरोग्य विभागाला स्वयंचलित यंत्रणेचे दर्शन न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. खोलात जाऊन माहिती घेतली असता ही खर्चिक यंत्रणा मुळात अजून पूर्णपणे दुरुस्त झाले नसल्याची माहिती आहे. मात्र या दुरुस्तीची सगळी बिले साशाच्या अकाउंटला फाडण्याचा निर्णय झाल्याने पालिका प्रशासन बिनधास्त आहेत.

दोन टन कचरा चक्क रस्त्यावर
साताऱ्यात कचरा कुंडीमुक्त संकल्पनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे. त्यासाठी शहरातील चक्क एकवीस कंटेनर उचलण्यात आलेत. मात्र घंटागाडीची वेळ चुकल्याने सातारकरांनी राहिलेला कचरा रस्त्यावरकोपऱ्यात टाकण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे सध्या दोन टनं कचरा रस्त्यावर ओतला जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)