“कॉफी विद करण’मध्ये सैफ-सारा 

करण जोहर याच्या चॅट शो “कॉफी विद करण’च्या सहाव्या सत्रात अनेक सेलेब्रिटिज येवून गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिर खानने यात सहभाग घेत आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. आता पुढील शोमध्ये बॉलीवुडचा नवाब सैफ अली खान आपली मुलगी सारा अली खानसोबत सहभागी होत आहे. याप्रसंगी वडील-मुलीच्या नात्यातील वेगळेपण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय सारानेही आपल्या पर्सनल लाइफ आणि आवडी-निवडी शेअर केल्या आहेत.

शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये करण जोहरने सैफला विचारले की, तु साराच्या बॉयफ्रेंडला कोण-कोणते प्रश्‍न विचारू इच्छितो. तेव्हा सैफ म्हणाला, पॉलिटिकल व्यूज आणि ड्रेग्सबाबत. त्यानंतर साराने आपल्या आवडी-निवडीबद्‌दल सांगितले. ती म्हणाली, मी रणबीर कपूरशी लग्न करू इच्छिते. पण त्याला डेट करू इच्छित नाही. तर कार्तिक आर्यनसोबत डेट करायला आवडेल. याशिवाय करणने सैफला करीनाबाबतही प्रश्‍न विचारले.

-Ads-

दरम्यान, “कॉफी विद करण’च्या सहाव्या सत्राचा शुभारंभ दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट यांच्या जोडीने झाला होता. त्यानंतर रणवीर सिंह आणि अक्षय कुमारने शोमध्ये धम्माल केली. या शोमध्ये आमिर खानच्या “ठग्स ऑफ हिंदोस्तान’चेही प्रमोशन करण्यात आले. तर मागच्या ऍपिसोडमध्ये वरूण धवन आणि कतरिना कैफ यांची जोडी झळकली होती. आता येत्या शोमध्ये सैफ-साराची जोडी धमाल करताना दिसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)