कॉन्स्टेबलने लावला लोकांना 88 लाखांना चुना

ठाणे – मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने आपण सीबीआयच्या स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुुपचे प्रमुख आहोत असे भासवून लोकांकडून तब्बल 88 लाख रूपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. अनंत प्रसाद पांडे असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे.

कासारवडवली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो येलो गेट पोलिस ठाण्यात तैनात होता पण गेल्या डिसेंबर पासून तो ड्युटीलाच आलेला नाही. त्याने मार्च 16 ते डिसेंबर 17 या अवधीत लोकांना दारूचे लायसन्स मिळवून देतो, रेल्वे स्टेशनवर स्टॉल मिळवून देतो, सरकारी नोकऱ्या देतो असे सांगून अनेकांकडून पैसे उकळले आहेत. त्याच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांच्याकडून त्याने 88 लाख रूपयांची रक्कम वसुल केल्याचे उघडकीला आले आहे. त्याला काल सात दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)