कॉन्स्टेबलनेच फोडली 11 एटीएम 

श्रीनगर: जम्मू काश्‍मीर पोलिस दलातील एका निलंबीत कॉन्स्टेबलनेच राज्यातील 11 एटीएम मशिन्स फोडल्याची बाब त्याच्या चौकशीत उघड झाली आहे. एजाज अहमद खान असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला याधीच अन्य गुन्ह्यांमध्ये निलंबीत करण्यात आले आहे. तो राज्यातील हायमा या गावचा रहिवासी असून त्याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.
राज्यात ज्या ज्या ठिकाणी एटीएम मशिन्स फोडण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासली असता त्यातील 11 ठिकाणी त्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने याची कबुलीही दिली आहे. त्याला सध्या कोट भलवाल कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर इतरही अन्य गुन्हे दाखल आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)