कॉचर बिरकर यांना मिळालेला पुरस्कार काही मिनिटातच गेला चोरीला

रिओ दि जिनेरो – कुर्दीशचे निर्वासीत असलेले आणि आता केंब्रीज विद्यापीठात गणित विषयाचे प्राध्यापक असलेल्या कॉचर बिरकर यांना गणित विषयातील त्यांच्या योगदाना बद्दल फिल्डस मेडल या पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र, त्यानंतर केवळ काही मिनिटांतच त्यांना मिळालेल्या पुरस्कारामधिल गोल्ड मेडलची चोरी झाल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.

ब्राझीलची राजधानी रियो डी जानीरो येथे झालेल्या गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये कॉचर बिरकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्या नंतर एकातासाच्या अवधीतच हा पुरस्कार चोरीला गेला. पुरस्कार चोरीला गेल्यानंतर गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेसने याबद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले की, ही घटना खुप दुर्दैवी असून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी पुरस्कारप्राप्त बिरकर यांनी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, मला मिळालेला हा पुरस्कार त्या 40 लाख निर्वासितांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा असेल अशी आशा करतो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार चौघांना मिळाला आहे. यात केंब्रिज विद्यापीठातील बिरकर, स्वीस फेडरल टेक्‍नोलॉजीच्या एलिसो फिगाली आणि बॉन विद्यापीठातील पीटर स्कूल्ज यांचा समावेश आहे. “फिल्डस मेडल’ला गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानले जाते. ब्राझीलची राजधानी रियो डी जानीरो येथे झालेल्या गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये हा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय वंशाचे गणितज्ञ अक्षय वेंकटेश यांना ‘फिल्डस मेडल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वेंकटेश यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून गणित आणि फिजिक्‍समधून पदवी मिळली होती. “फिल्डस मेडल’ हा पुरस्कार दर चार वर्षांनी एकदा दिला जातो.

वेंकटेश सध्या स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. सर्व विजेत्यांना सोन्याचे पदक आणि 15 हजार डॉलर रोख पुरस्कार मिळणार आहेत. “फिल्डस मेडल’ पुरस्कार मिळवणारे वेंकटेश भारतीय वंशाचे दुसरे गणितज्ञ आहेत. याआधी 2014 मध्ये मंजुल भार्गव यांना हा पुरस्कार मिळाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)