कॉग्रेसचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची भाजपची मागणी

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे हात हे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत दिल्ली भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे.

निवडणुकी दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक चिन्हाचं प्रदर्शन करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे हात हे चिन्ह रद्द करावे, अशी मागणी उपाध्याय यांनी आयोगाकडे केली आहे. उपाध्याय यांनी याबाबत सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांची भेट घेतली. याप्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभारावा लागला तरीही मागे हटणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)