कॉक्‍निजनचे योग वासन दुहेरी मुकुटाचे मानकरी

 

पिंपरी– औद्योगीक क्रीडा संघटने तर्फे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड पुरस्कृत रहाटणी येथील टेबल टेनिस पुरूष एकेरी व पुरूष दुहेरीचे अंतिम स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. यामध्ये कॉक्‍निजन कंपनीचा योग वासन दुहेरी मुकुटाचा व श्रेयस इंजिनिअर्सचा सचिन दारवटकर उपविजेता ठरला. प्राज इंडस्ट्रीज्‌चे वरिष्ठ अधिकारी प्रदीप धोटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. जेष्ठ टेबल टेनिसपटू अविनाश जोशी अध्यक्षस्थानी होते. एकम संस्थेचे संस्थापक सुभोद कोरडे कार्यक्रमास उपस्थित होते. शंकर गाढवे यांनी प्रास्ताविक केले. राहुल कापसे यांनी आभार मानले. सदाशिव गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. योग वासन याने सचिन दारवटकर याच्यावर 9-11, 11-7, 11-8, 11-7 असा विजय मिळवला. पुरुष दुहेरी अंतीम सामन्यात योग वासन व सुजित प्रधान यांनी बजाज ऍटोच्या अमित पाटील व रविंद्र कुलकर्णी यांचा 11-5, 7-11, 11-6, 6-11, 11-6 असा पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)