कॉंग्रेस 26 मे रोजी विश्‍वासघात दिवस पाळणार

नवी दिल्ली – येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला केंद्रात सत्तेवर येऊन चार वर्ष पुर्ण होत आहेत. तो दिवस मोदी सरकारच्या विरोधात विश्‍वासघात दिवस म्हणून साजरा करून मोदी सरकारचा निषेध केला जाईल असे कॉंग्रेसने म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी ही माहिती दिली.

देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या निमीत्त निदर्शने आयोजित केली जातील आणि मोदींनी जनतेची कशी फसवणूक केली याची माहिती दिली जाईल असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मोदींनी देशाचा विनाश केला असा आरोपही गेहलोत यांनी केला. या दिनी कॉंग्रेस अन्य विरोधी पक्षांना सोबत घेऊन मोदी सरकारला सत्तेवरून घालवण्याचा निर्धार करेल असेही त्यांनी सांगितले.

मोदी सरकारमुळे सामान्य माणसाला जगणेच मुष्किल झाले असून त्यांना भोगाव्या लागणाऱ्या सर्व समस्यांचे विषय आम्ही त्या दिवशी मांडणार आहोत असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)