कॉंग्रेस लोकांशी बांधील…

भाजप-संघाकडून मात्र लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न


राहुल गांधी यांची बर्लिन मध्ये टीका

नवी दिल्ली – आपला पक्ष लोकांशी बांधिलकी जपणारा पक्ष आहे पण भाजप आणि संघाची विचारसरणी मात्र लोकांमध्ये विभाजन करणारी आहे अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस तर्फे काल रात्री बर्लिन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीयांशी संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली. विविधतेत एकता हे कॉंग्रेसचे सूत्र आहे आणि हे तत्व गुरूनानकदेव यांच्या काळापासून चालत आले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

संघ आणि भाजपवर टीका करताना ते म्हणाले की त्यांचे नेते लंबीचौडी भाषणे देऊन लोकांच्या मनात द्वेषच पसरवण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत आणि युवकांना त्यांचे भविष्य अंधकारमय दिसू लागले आहे. कॉंग्रेसच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेस सर्वांसाठी आहे. विविधतेत एकता सामावलेली असते या विचारसरणीवर ज्यांचा विश्‍वास आहे त्या सर्वांसाठी कॉंग्रेस आहे. पण आजचे भारत सरकार मात्र या तत्वाच्या अगदी विरोधात काम करताना दिसते आहे. लोकांना एकत्र आणून देशाला पुढे नेणे हे आमचे कर्तव्य आहे. आणि आम्ही हे काम करून दाखवले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

रोजगार निर्मीतीच्या बाबतीत चीन आमच्या पुढे निघून गेला आहे असे नमूद करताना त्यांनी सांगितले की आज चीन 24 तासात 50 हजार नोकऱ्या निर्माण करतो पण भारतात मात्र 24 तासात केवळ 450 नोकऱ्या निर्माण होतात. ते फक्त भाषणे देतात आणि लोकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करतात ती त्यांची संस्कृती आहे असा आरोपही त्यांनी केला.

जर्मनीत राहणाऱ्या पंजाबी नागरीकांनी कॉंग्रेसला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. पंजाबात आपल्या पक्षाचे सरकार असून ते तुमच्या कोणत्याही अडचणीला धावून येईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी शीख धर्माच्या तत्वज्ञानाचाही गौरव केला. राहुल गांधी हे दोन दिवसांच्या जर्मन दौऱ्यावर आले होते तेथून ते ब्रिटनला रवाना झाले. तेथे लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्‍सच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)