कॉंग्रेस, राष्ट्रवादीवाले अंधारात नारळ फोडतात

जेजुरी येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री दिपक सावंत यांची टीका

जेजुरी- जेजुरी ग्रामीण रुग्णालयाकरिता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोणाकडून या कामासाठी साधे पत्रही मला आले नाही. सत्ता नसल्यामुळे त्यांना कुठेच नारळ फोडायला मिळत नाही. श्रेयासाठी अंधारात नारळ फोडायचे काम सध्या ही मंडळी करीत आहेत, अशी टीका आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी केली.
जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अद्ययावत आणि देखण्या इमारतीचे उद्‌घाटन आज आरोग्यमंत्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून उभे राहिलेले अप्रतिम काम खासगी रुग्णालयालाही लाजवेल, अशा स्वरूपाचे आहे. पुरंदर तालुक्‍याच्या सर्व सामान्यांच्या सेवेसाठी आज हे रूग्णालय खुले होत आहे. हे रुग्णालय म्हणजे केवळ भिंती नव्हेत तर सर्व सुविधांनी सुसज्ज, असे आरोग्य मंदीर असणार आहे. शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आणि आयुष्यमान भारत योजनेचा अधिकाधिक लाभ या रूग्णालयाद्वारे घ्यावा, असे आवाहन करताना मंत्री सावंत यांनी रुग्णालयाच्या इमारतीसह हे अप्रतिम काम करणाऱ्या आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.
जेजुरीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्यमंत्री विजय शिवतारे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, माजी सभापती अतुल म्हस्के, जि. प. सदस्य दिलीप यादव, शालिनी पवार, ज्योती झेंडे, पं. स. सदस्य रमेश जाधव, नलिनी लोळे, गोरखनाथ माने, नियोजन मंडळाचे सदस्य गिरीश जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, भाजप शहराध्यक्ष अशोक खोमणे, सेनेचे शहरप्रमुख किरण दावलकर, महेश स्वामी, माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर, उपशहरप्रमुख रवींद्र निंबाळकर, सासवडचे नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, माजी नगरसेवक राजेंद्र दळवी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी हॉस्पिटलला जागा देणाऱ्या माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांचे आरोग्यमंत्री सावंत आणि राज्यमंत्री शिवतारे यांनी आभार मानले.

  • सुप्रिया सुळे सेल्फीसाठी आल्याच नाहीत…
    राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या कार्यक्रमात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चौफेर हल्ला चढवला. शिवतारे म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे सेल्फी काढत फिरतात. पण, आज एवढ्या मोठ्या कामाच्या सेल्फीसाठी निमंत्रण देऊनही त्या आल्या नाहीत. पुरंदर तालुक्‍यात हडपसर-सासवड-जेजुरी मार्ग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावोगावी रस्त्यांची कामे, जलसंधारणाची कामे, क्रीडासंकुल, धान्य गोदाम, आरटीओ अशी असंख्य कामे झाली आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रगतीपथावर आहे. बारामती घडवायला पवार कुटुंबाची 50 वर्ष गेली. पुरंदर-हवेली या रस्त्यावर अवघ्या नऊ वर्षात तेवढा विकास झाला. येत्या दोन-चार वर्षात पुरंदर तालुका बारामतीलाही मागे टाकेल, अशा स्थिती कामे सुरू आहेत. नेमकी हीच पोटदुखी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)