कॉंग्रेस, राष्ट्रवादीची लवकरच जागा वाटप बैठक

माजीमंत्री हषवर्धन पाटील यांची माहिती

पुणे/रेडा- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरिता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडातील जागा वाटपाची विशेष बैठक मुंबईत गुरूवार (दि.20) आणि शुक्रवार (दि. 21 डिसेंबर) होणार आहे. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या या बैठकीत समविचारी पक्षातील नेत्यांच्या उपस्थित याबाबत निर्णय घेतले जाणार असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील निकाल कॉंग्रेस पक्षाच्या बाजुने लागले आहेत. यामध्ये तीन राज्यात तर कॉंग्रेसने एक हाती सत्ता मिळविली आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुक पुढील वर्षी 2019 मध्ये होत आहे, तर त्यानंतर वर्षाच्या मध्यास विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतील जागा वाटप या महत्त्वाच्या प्रश्‍नावर पुढील आठवड्यात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांत प्राथमिक चर्चा सुरू होणार आहे.
याबाबत माजी सहकामंत्री हषवर्धन पाटील यांनी सांगितले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह समविचार पक्षांशी बोलणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानुसार आघाडीत सामील होण्याकरिता काही समविचारी पक्षांच्या वरिष्ठांशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह आघाडीत सामील होणाऱ्या पक्षाला किती जागा याबाबतही चर्चा करणार आहोत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटपाची चर्चा होणार होती. परंतु, सरकार विरोधातील अविश्‍वास ठरावासह अन्य राष्ट्रीय प्रश्‍न तसेच राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका, आरक्षण आंदोलन, अशा काही कारणामुळे चर्चा लांबली होती.
दरम्यान, गेल्या दोन लोकसभा निवडणुकांतील जागा वाटपाचे सूत्र निश्‍चित झाले होते. तेच सूत्र यंदाही कायम ठेवावे, असे प्रयत्न असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर करताना अंतिम निर्णय मात्र दिल्लीतील बैठकीनंतरच होईल, असे स्पष्ट केले होते. तर, लोकसभा 2009 आणि 2014च्या निवडणुकीत कॉंग्रेसने 26 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 22 जागा लढविल्या होत्या; तर, बदलत्या राजकीय समीकरणानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत निम्म्या जागांचे वाटप व्हावे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती. परंतु, आता उत्तरेकडील राज्यांचे निकाल पाहता कॉंग्रेसकडूनही अधिक जागांची मागणी होवू शकते, असेही सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)