कॉंग्रेस माझ्या आईला राजकारणात ओढतोय : नरेंद्र मोदी 

छतरपूर: कॉंग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये माझ्याशी लढण्याची ताकद नाही. तसेच माझ्याविरोधात बोलण्यासारखे मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळेच ते आता माझ्या आईला राजकारणात ओढत आहेत. फुटीचे राजकारण करणाऱ्या कॉंग्रेसला जनता कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. रुपयाचे अवमूल्यन होत असून, त्याचे मूल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या वयाच्या जवळपास पोहोचले आहे, असे वादग्रस्त विधान कॉंग्रेस नेते राज बब्बर यांनी केल्यानंतर मोदींनीही कॉंग्रेसवर पलटवार केला आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी छतरपूरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना जनतेने “मामा’ संबोधलेले कॉंग्रेसच्या नेत्यांना आवडत नाही. मग ते आपल्या अँडरसन आणि क्वात्रोची या मामांबद्दल का बोलत नाहीत.

-Ads-

बोफोर्स घोटाळ्यात हात असलेला क्वात्रोची आणि भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेला अँडरसन हे दोघे राहुल गांधींचे मामा होते. त्याचमुळे त्यांना भारतात गुन्हे करूनही खास विमानाने अमेरिकेला पळवून देण्यात आले. भोपाळमध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेमुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला राजीव गांधी यांनी पळवून लावले. अँडरसन आणि क्वात्रोची या दोघांनाही लपून छपून अमेरिकेत पोहचवण्यात आले. या दोघांनीही भारताच्या तिजोरीवर डल्ला मारला, असा आरोप त्यांनी केला.

मतदान करण्यासाठी जाताना कॉंग्रेसला 15 वर्षांपूर्वी राज्यातून का हद्दपार केले होते, हे आठवा. फुटीच्या राजकारणामुळे जनता त्यांच्यावर नाराज होती. कॉंग्रेसचे भविष्य आजही असंच आहे. देशातील सव्वाशे कोटी जनताच आमची हायकमांड आहे. आमचे सरकार हे “मॅडम’च्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)