कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार चालविणे हे आव्हानच- कुमारस्वामी

बंगळूरू : काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीचे सरकार चालवणे ही सोपी गोष्ट नसून ते माझ्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे, अशी कबुली जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी श्रृंगेरी येथे दिली. कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्याबरोबर अन्यही काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असून जी. परमेश्वर बुधवारी शपथ घेतील.

आद्य शंकराचार्य यांच्या श्रृंगेरीतील मठात दर्शनासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडू शकेन, असे मला वाटत नाही. लोकांमध्येही साशंकता आहे. ती केवळ माझ्याबद्दलच नाही, तर हे सरकार कामकाज उत्तमपणे पार पाडेल की नाही, याबद्दलही आहे. पण जगद्गुरू शंकराचार्य आणि शारदाम्बा देवी यांच्या आशीर्वादाने सर्व सुरळीत पार पडेल, असा मला विश्वास वाटतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)