कॉंग्रेस-जेडीएसचा 117 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

राज्यपालांकडे यादी केली सादर
बंगळूर – दबावतंत्राचा वापर करत कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आज राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हातमिळवणी करणाऱ्या या पक्षांनी 117 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत त्यांची यादीच राज्यपालांकडे सादर केली.

कॉंग्रेस आणि जेडीएसच्या विधिमंडळ पक्षांच्या बैठका येथे झाल्या. त्यानंतर जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी.परमेश्‍वर यांनी राज्यलांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, जेडीएस, कॉंग्रेस आणि बसपच्या आमदारांची मिळूून संख्या 117 इतकी भरते. या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आम्ही राज्यपालांना सादर केले. आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षांनी केलेले ठरावही राज्यपालांना सादर करण्यात आले. सरकार स्थापनेबाबतच्या आमच्या दाव्याचा विचार करण्याची विनंती आम्ही राज्यपालांना केली.

सरकार स्थापनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांविषयी कायदेतज्ञांशी सल्लामसलत करून निर्णय घेतला जाईल, असे राज्यपालांनी आम्हाला कळवले. आता पुढचे पाऊल राज्यपालांनाच उचलायचे आहे. निर्णय घेताना ते राज्यघटनेशी बांधील राहतील अशी आशा करूया, अशी पुस्तीही कुमारस्वामी यांनी जोडली. जेडीएसच्या सर्व आमदारांमध्ये एकी आहे. ते आमच्याबरोबर आहेत, असा दावाही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)