कॉंग्रेस खासदार कासमी यांचे निधन 

किशनगंज – बिहार मधील किशनगंजचे लोकसभा सदस्य मौलाना असरूल हक कासमी यांचे आज त्यांच्या गावीच हदयविकाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे. ते जमाते उलेमा ए िंहंद चे माजी प्रदेशाध्यक्ष होते आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे ते सदस्य होते. ते दोन वेळा किशनगंज लोकसभा मतदार संघातून विजयी झाले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे किशनगंजला एक्‍स्टेंशन काऊंटर उघडण्यात मोठा पुढाकार घेतला होता. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)