कॉंग्रेस कार्यकाळात आरएसएसच्या 24 कार्यकर्त्यांची हत्या – अमित शहा

म्हैसूर – कॉंग्रेसच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कर्नाटकमध्ये भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) जवळपास 24 कार्यकर्त्यांची हत्या झाली असून सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

अमित शहा दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी 24 कार्यकर्त्यांची हत्या झाली, मात्र कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप केला. सिद्धरमय्या यांचे सरकार पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असून लवकरच भाजपा सरकार सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“कॉंग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या भाजपा आणि आरएसएस कार्यकर्त्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. 24 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून, हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत. सिद्धरमय्या सरकारचा शेवट जवळ आला आहे आणि एकदा भाजपा सत्तेत आली की न्याय मिळेल याची खात्री घेऊ, असे अमित शहा बोलले आहेत.

अमित शहा यांनी म्हैसूर येथून आजच्या दौऱ्याची सुरुवात केली. अमित शहा मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या मतदारसंघाचाही दौरा करणार आहेत. सोबतच येदीयुरप्पा यांच्यासोबत म्हैसूर पॅलेसचा दौरा करत शाही कुटुंबाची भेट घेणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी सिद्धरमय्या यांनी अहिंदू असा उल्लेख केल्याबद्दल अमित शहा यांच्यावर टीका केली होती. आधी त्यांनी आपण अहिंदू आहोत की नाही, हे स्पष्ट करुन दाखवावे असे आव्हानच त्यांनी केले. “अमित शहा हे जैन आहेत. आधी त्यांनी आपण अहिंदू आहोत की नाही हे स्पष्ट करावे. जैन हा वेगळा धर्म आहे. ते माझ्याबद्दल असे कसे काय बोलू शकतात’, असे सिद्धरमय्या बोलले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)