कॉंग्रेस कर्नाटकात देणार पाच वर्षात एक कोटी रोजगार

मंगळुरू – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने कर्नाटकात पाच वर्षात एक कोटी लोकांना रोजगार देण्याचा वायदा केला आहे. हा जाहीरनामा म्हणजे कर्नाटकच्या लोकांची मनकी बात आहे असे राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की हा जाहीरनामा म्हणजे केवळ तीन चार लोकांनी बंद खोलीत बसून तयार केलेले माहितीपत्रक नाही. त्यात लोकांच्या आशा आकांक्षा समावलेल्या आहेत. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना केवळ त्यांच्या मन की बात ऐकवतात पण आम्ही मात्र यात कर्नाटकातील लोकांच्या मनातील बात सांगितली आहे.

यापुढे आता भाजपचा जाहीरनामाही प्रकाशित होईल पण तो कर्नाटकासाठी नसेल तर त्यात संघाच्या लोकांचे विषय समाविष्ट केलेले असतील. ते म्हणाले की कॉंग्रेसन सन 2013 च्या निवडणूकीत जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्यातील 95 टक्के आश्‍वासने मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्या सरकारने पुर्ण केली आहेत. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 225 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून तेथील रणधुमाळी आता चांगलीच रंगली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)