नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्ष सध्या आयसीयू मध्ये असून आपल्या अस्तित्वासठी त्याला विविध पक्षांच्या “सपोर्ट सिस्टिम्स’ची गरज आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. ते नरेंद्र मोदी ऍपच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. महागठबंधन म्हणजे संधिसाधूंचे एकत्र येणे आहे. त्यांचे एकत्र येणे हे केवळ आपली कमजोरी लपवण्यासाठी आहे.

आयसीयूमध्ये असलेल्या माणसाला वाचवण्यासाठी सपोर्ट सिस्टिमची आवश्‍यकता असते. आज कॉंग्रेस अशा सपोर्ट सिस्टिमच्या शोधात आहे. कोणाशीही समझोता करणार नाही, असे कॉंग्रेसने महाअधिवेशनात म्हटले होते; मग आज महागठबंधनाची आवश्‍यकता का भासत आहे? भाजपाच्या भीतीपोटीच.

कॉंग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, ते नामदार आहेत, तर आम्ही कामदार आहोत; त्यांना कुटुंबाचे कल्याण करायचे आहे, तर आम्हाला राष्ट्र निर्माण करायचे आहे. भाजपा विरोधी पक्षाच्या कमजोरीवर नाही, तर सव्वाशे करोड जनतेच्या सामर्थ्यावर चालते आहे. जनतेला सांगावे असे आमच्याकडे खूप काही आहे. कार्यकर्त्यांनी सत्य घेऊन जनतेकडे जावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)