कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही मी टू मोहीमेला पाठिंबा 

नवी दिल्ली: देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात खुलेपणाने बोलण्यासाठी “मी टू’ ची मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की आता खरे बोलण्याची वेळ आली आहे. बदल घडवण्यासाठी मोठ्याने आणि ठळकपणाने खरे बोलावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री एम. जे अकबर यांच्याही विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. तथापी त्यांनी या मंत्र्याचा आपल्या ट्‌विटर संदेशात उल्लेख केलेला नाही. त्यांनी म्हटले आहे की महिलांना सन्मान देण्यास प्रत्येकानेच शिकले पाहिजे. हा एक मोठा इश्‍यु असून त्यावर मी एखाद्या पत्रकार परिषदेत सविस्तरपणे बोलेन असे त्यांनी गुरूवारी नमूद केले होते. त्या पाठोपाठ आज त्यांनी आपल्या ट्‌विटरवर या मोहीमेला पाठिंबा दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)