कॉंग्रेसला 70 वर्षात जमले नाही ते खरेच भाजपने करून दाखवले: राहुल गांधी

कॉंग्रेस अध्यक्ष  यांचा उपरोधिक टोला

नवी दिल्ली: कॉंग्रेसला जे 70 वर्षात जे जमले नाही ते खरेच भाजपने चार वर्षात करून दाखवले आहे. आज रूपयाचे विक्रमी अवमुल्यन झाले आहे, इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. गॅस सिलिंडरच्या किमंती आठशे रूपयांवर गेल्या आहेत. देशात द्वेष पसरवून देश विभाजनाच्या पातळीवर त्यांनी नेऊन ठेवला आहे. हे खरेच आम्हाला जमले नव्हते ते भाजपने करून दाखवले अशा शब्दात भाजपच्या कारभाराची कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली आहे.

भारत बंदच्या निमीत्ताने रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. 22 राजकीय पक्षांनी आजच्या बंदला पाठिंबा दिला होता. बंद पुर्ण यशस्वी झाल्याचा दावाही कॉंग्रेस पक्षाने केला आहे. रामलिला मैदानावरील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की रूपयाच्या दराने आज सर्वात नीचांकी पातळी गाठली असून पेट्रोल चे दर महाराष्ट्रासारख्या राज्यात जवळपास 90 रूपयांच्या पातळीवर पोहचले आहेत. मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच लोकांवर ही स्थिती ओढवली आहे असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की या सरकारच्या धोरणामुळे देशातील छोटे विक्रेते साफ झोपले आहेत.

नोटबंदी कशासाठी केली गेली याचे कारण आजही लोकांना समजले नाही. आज लोकांना जे ऐकायचे आहे, युवकांना सरकारकडून जे ऐकायचे आहे त्यावर मोदी काहीही बोलत नाहीत. ते कोणत्या विश्‍वात वावरत आहेत हेच समजेनासे झाले आहे. ते फक्त भाषणे देत फिरत आहेत लोकांना आता त्यांच्या पोकळ भाषणांचा विट आला आहे लोकांमध्ये या सरकार विषयी प्रंचड नैराश्‍य निर्माण झाले आहे असेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी आज सर्वात प्रथम महात्मा गांधी यांच्या राजघाटावरील समाधीचे दर्शन घेतले. तेथे त्यांनी मानसरोवर यात्रेवरून आणलेले पवित्र जल अर्पण केले आणि ते रामलिला मैदानावरील सभेसाठी आले होते. या सभेला बंदला पाठिंबा असणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)