भोपाळ – आपल्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याने संतापलेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना ते माझ्या रक्तासाठी तहानलेले असल्याचा सनसनाटी आरोप केला. अशा प्रकारच्या कृत्यांसाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची मान्यता आहे का अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

पत्रकार परिषदेमध्ये हल्लाबोल करताना ते म्हणाले की, कॉंग्रेस माझ्या रक्तासाठी तहानलेला आहे, मध्य प्रदेशच्या राजकारणात यापूर्वी असे कधीही झालेले नाही, विचारांचा संघर्ष चालूच असतो, वेगवगळे पक्ष कार्यक्रम करत असतात पण दगडफेकीचा कार्यक्रम झाला नाही.

तुम्हाला कोणत्या मार्गाने पक्ष चालवायचा आहे, कार्यकर्ते जे काही करत आहेत ते चालते का, असा प्रश्‍न त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राज्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)