कॉंग्रेसला ईशान्य भारताविषयी अजिबात कळवळा नाही -नरेंद्र मोदी

लुंग्लेई: कॉंग्रेसला ईशान्य भारताविषयी कोणताच कळवळा दिसला नाही त्यांनी ईशान्य भारताच्या संस्कृतीचा नेहमीच अवमान केला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांनी आज येथे एक प्रचार सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की कॉंग्रेसने केवळ फोडा आणि झोडा या नितीने राजकारण केले त्यामुळेच हा पक्ष आता केवळ दोन-तीन राज्यांमध्ये उरला आहे.

ते म्हणाले की एकेकाळी संपुर्ण देशावर राज्य असलेला कॉंग्रेस पक्ष आता केवळ दोन-तीन राज्यांपुरता उरला आहे. आता कॉंग्रेसच्या पंज्यातून निसटण्याची मिझोरामच्या नागरीकांना ही शेवटची संधी आहे. ते म्हणाले की मिझोरामच्या जनतेशी त्यांना काही एक देणेघेणे नाही त्यांना केवळ येथील सत्तेला चिटकून राहायचे आहे असे ते म्हणाले. ईशान्य भारताच्या पोषाखाचीही जेव्हा कॉंग्रेसचे नेते थट्टा करतात तेव्हा मला कॉंग्रेसविषयी कमालीचा राग येतो. तुमच्या आशा आकांक्षाशी त्यांना काहीएक देणे घेणे नाही त्यांना येथे फक्त सत्ता हवी आहे असा आरोपही त्यांनी केला. केंद्रातील भाजप सरकारने देशातील भारतीय संस्कृतीचा सन्मानच करण्याचे काम केले आहे असा दावाही त्यांनी केला. ईशान्य भारतातील प्रत्येक प्रांताचा विकास करण्याचे काम आपल्या सरकारने केले असल्याचेही मोदी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)