कॉंग्रेसने सपा-बसपा युतीला पाठिंबा द्यावा- अखिलेश यादव

File photo

लखनौ: भारतीय जनता पक्षाशी सशक्तपणे लढायचे असेल तर उत्तरप्रदेशात कॉंग्रेसने समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला पाठिंबा द्यावा अशी सुचना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाच्या घोषणेचेही अखिलेश यांनी स्वागत केले आहे.

कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने तो त्यांचा राजकीय मास्टर स्ट्रोक असल्याचे मानले जात आहे त्या विषयी प्रतिक्रीया विचारली असता अखिलेश यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की आम्ही बहुजन समाज पक्षाशी या आधीच आघाडी केली असून अमेठी आणि रायबेरलीत आम्ही कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा जाहींर केला आहे. त्यामुळे भाजपला जर धूळ चारायची असेल तर कॉंग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यायला हवा असे ते म्हणाले. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचे आम्ही स्वागतच करतो असेही त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी कुंभमेळ्याच्या निमीत्ताने प्रयागराज येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे त्या विषयी विचारले असता अखिलेश म्हणाले की ही बैठक तुम्ही घेणार आहात तर तुम्ही येथील दानाची परंपरा कायम ठेऊन या भागाच्या विकासासाठी भरीव निधी दान केला पाहिजे. दरम्यान स्वत: अखिलेश यांनीही कुंभ मेळ्याच्या निमीत्ताने गंगा-यमुना-सरस्वती या तीन नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान केले. कुंभ मेळ्याच्या व्यवस्थेच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की या मेळ्याच्या व्यवस्थापनात मुस्लिम अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेले योगदानही महत्वाचे आहे. आमच्या सरकारच्या काळात नगरविकास मंत्री मोहंमद आझम खान, आरोग्यमंत्री अहमद हसन आणि राज्याचे तत्कालिन मुख्य सचिव जावेद उस्मानी यांनी कुंभ मेळ्याची चोख व्यवस्था ठेवली होती अशी माहितीही त्यांनी आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नमूद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)