कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा मतपेढीसाठी वापर केला

पंतप्रधान मोदींचा आरोप
मलौत (पंजाब) – कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा मतपेढीसाठी वापर करून त्यांचा विश्‍वासघात केला. केवळ एकाच कुटुंबाचे हित जपण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला गेला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की प्रचंड कष्ट करूनही शेतकऱ्यांच्या वाट्याला गेली अनेक दशके हालअपेष्टाच आल्या. त्याला कॉंग्रेस सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत ठरली असा आरोपही त्यांनी केला.

कॉंग्रेसने समाजातील कोणत्याच घटकाच्या हिताचा विचार केला नाही. त्यांना केवळ एकाच कुटुंबाच्या हिताची चिंता पडली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शेतकरी मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की तुम्ही शेतीसाठी जेवढी गुंतवणूक करता त्याच्या तुलनेत तुम्हाला केवळ दहा टक्केच नफा मिळतो याची मला कल्पना आहे. या मागे काय कारण आहे याचीही मला कल्पना आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे पण या अन्नदात्याचीच कॉंग्रेसने उपेक्षा केली त्यांचा विश्‍वासघात केला. कॉंग्रेसने शेतकऱ्यांचा वापर केवळ मतपेढीसाठी केला.

शेतकऱ्यांचे हे चित्र बदलण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे असा दावही त्यांनी केला. आमच्या सरकारने नुकतीच शेती मालाच्या किमंतीत प्रचंड वाढ केली.

भाजप आणि अकालीदलाच्यावतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या या किसान कल्याण रॅलीला पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, अकालीदलाचे प्रमुख सुखबीरसिंग, केंद्रीय मंत्री हरसिरमन कौर बादल इत्यादी नेते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)